डीएपी-युरिया पुरवठा व वीज समस्यांबाबत खानापूर म. ए. समितीचे निवेदन

डीएपी-युरिया पुरवठा व वीज समस्यांबाबत खानापूर म. ए. समितीचे निवेदन

खानापूर : शेतकरी बांधवांना डीएपी व युरिया खतांचा सुरळीत पुरवठा करावा, या मागणीसाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

सध्या तालुक्यात खतांची टंचाई निर्माण होत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आवश्यक त्या प्रमाणात डीएपी व युरिया खत उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

तसेच तालुक्यात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करावा, या मागणीसाठी हेस्कॉमच्या सहाय्यक अभियंत्यांनाही समितीच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिक व शेतकरी वीज समस्येमुळे त्रस्त असून तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी प्रकाश चव्हाण, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, युवा समिती अध्यक्ष धनंजय पाटील, अजित पाटील, जयसिंगराव पाटील, प्रकाश पाटील, शिवाजी पाटील, कृष्णा मन्नोळकर, अमृत शेलार, एस. एच. गुरव, पुंडलिक पाटील, नागेश भोसले, संदेश कोडचवाडकर, गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत, रमेश धबाले, व्ही. व्ही. पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

11 − 2 =

error: Content is protected !!