तेलंगणा–कर्नाटक रेल्वे संपर्काला मोठी चालना; बेळगावसाठी तीन नवीन साप्ताहिक एक्सप्रेस गाड्या नियमित

तेलंगणा–कर्नाटक रेल्वे संपर्काला मोठी चालना; बेळगावसाठी तीन नवीन साप्ताहिक एक्सप्रेस गाड्या नियमित

दक्षिण मध्य रेल्वेने तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक यांना जोडणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी दिली आहे. रेल्वे बोर्डाने हैदराबाद – बेळगाव, सिकंदराबाद – बेळगाव आणि चारलापल्ली – बेळगाव या तीन साप्ताहिक एक्सप्रेस गाड्यांना नियमित मान्यता दिली असून मे महिन्याच्या मध्यापासून या गाड्या नियमित सेवेत धावणार आहेत.

रेल्वे बोर्डाच्या मंजुरीनंतर या विशेष गाड्यांचे नियमित एक्सप्रेस सेवेत रूपांतर करण्यात आले आहे. यामुळे बेळगावसह उत्तर कर्नाटकातील प्रवाशांना तेलंगणा आणि आंध्रप्रदेशकडे प्रवास करणे अधिक सोयीस्कर होणार आहे.

17071/17072 हैदराबाद – बेळगाव – हैदराबाद साप्ताहिक एक्सप्रेस 15 मे 2026 पासून सुरू होणार असून ही गाडी गुरुवारी हैदराबादहून सुटणार तर शुक्रवारी बेळगावहून परतीचा प्रवास करणार आहे.

तसेच 17073/17074 सिकंदराबाद – बेळगाव – सिकंदराबाद साप्ताहिक एक्सप्रेस 18 मे 2026 पासून सुरू होणार आहे. ही गाडी सोमवारी सिकंदराबादहून सुटून मंगळवारी बेळगावला पोहोचणार असून परतीचा प्रवास मंगळवारीच होणार आहे.

याशिवाय 17075/17076 चारलापल्ली – बेळगाव – चारलापल्ली साप्ताहिक एक्सप्रेसलाही मंजुरी मिळाली असून 16 मे 2026 पासून सेवा सुरू होणार आहे. ही गाडी शनिवारी चारलापल्लीहून सुटून रविवारी बेळगावला पोहोचणार आहे.

या तिन्ही गाड्या सिकंदराबाद, बेगमपेट, लिंगमपल्ली, विकाराबाद, रायचूर, गुन्टकल, होस्पेट, हुबळी, धारवाड, लोंढा आणि खानापूर मार्गे धावणार आहेत. त्यामुळे व्यापारी, विद्यार्थी, नोकरदार आणि प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

रेल्वे संपर्क अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात असून बेळगाव आणि तेलंगणा दरम्यानच्या प्रवासाला यामुळे नवी गती मिळणार आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

fifteen + 3 =

error: Content is protected !!