शहापूर पोलिसांची मोठी कारवाई ; घरफोडी प्रकरणातील आरोपी दिल्लीतून जेरबंद, ₹45.56 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

शहापूर पोलिसांची मोठी कारवाई ; घरफोडी प्रकरणातील आरोपी दिल्लीतून जेरबंद, ₹45.56 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

बेळगावातील शहापूर परिसरात घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा शहापूर पोलिसांनी यशस्वी छडा लावत एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून तब्बल ₹45.56 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतनगर, शहापूर येथील एका घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करत सोन्याचे दागिने लंपास केले होते. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 42/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 च्या कलम 331(3), 331(4) आणि 305 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान पोलिसांनी मिंटू बिस्वास उर्फ चिंटू (वय 52), रा. टिळक नगर, पश्चिम दिल्ली याला अटक केली. आरोपीकडून 294.190 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत ₹44,86,390 इतकी आहे.

तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली होंडा अ‍ॅक्टिव्हा दुचाकीही पोलिसांनी ताब्यात घेतली असून तिची किंमत सुमारे ₹70 हजार असल्याचे सांगण्यात आले.

एकूण ₹45,56,390 किमतीचा मुद्देमाल शहापूर पोलिसांनी हस्तगत केला असून पुढील तपास सुरू आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

4 × 3 =

error: Content is protected !!