पर्वतीनगरमध्ये दहशत ; दिशाविचारण्यासाठी थांबलेल्या वाहनचालकाला मद्यधुंद तिघांकडून खंडणीचा प्रयत्न.

पर्वतीनगरमध्ये दहशत ; दिशाविचारण्यासाठी थांबलेल्या वाहनचालकाला मद्यधुंद तिघांकडून खंडणीचा प्रयत्न.

बेळगावातील पर्वतीनगर परिसरात रविवारी धक्कादायक प्रकार घडला असून दिशाविचारण्यासाठी थांबलेल्या वाहनचालकाला तीन मद्यधुंद व्यक्तींनी अडवून पैशांची मागणी करत दहशत माजवल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित वाहनचालक एका व्यक्तीकडे रस्त्याची विचारणा करत असताना अचानक तिघेजण तेथे आले. “तुम्ही आम्हाला धडक दिली आहे” असा आरोप करत त्यांनी पैशांची मागणी सुरू केली. मात्र वाहनात डॅशकॅम असल्याचे सांगत “चला पोलीस स्टेशनला जाऊ” असे वाहनचालकाने म्हटल्यावर संबंधित तिघांनी आक्रमक भूमिका घेतली.

यावेळी आरोपींनी वाहनावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असून एका व्यक्तीच्या हातात टिकाव (Pickaxe) असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

संबंधितांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

1 × four =

error: Content is protected !!