जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त जगदीश कुंटे यांचा पुण्यात सत्कार

जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त जगदीश कुंटे यांचा पुण्यात सत्कार


पुणे: जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त पुण्यातील बालगंधर्व कला दालनात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने देशभरातील नामवंत चित्रकारांनी शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची आपल्या खास शैलीत रेखाटलेली चित्रे आणि अर्कचित्रे प्रदर्शनात सादर केली. तसेच ठाकरे यांनी रेखाटलेली काही निवडक व्यंगचित्रेही रसिकांच्या पाहण्यासाठी ठेवण्यात आली होती.

या दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ व्यंगचित्रकारांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये बेळगावचे जगदीश कुंटे यांच्यासह वैजनाथ दुलंगे, श्रीनिवास प्रभुदेसाई, अवि जाधव, राजीव गायकवाड, रवींद्र बाळापुरे आणि खलील खान यांचा समावेश होता.

याशिवाय दोन दिवसांच्या या महोत्सवात नामवंत व्यंगचित्रकारांची प्रात्यक्षिके, प्रदर्शने तसेच लहान मुलांसाठी कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ कवी व वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांच्या हस्ते झाले.

हा कार्यक्रम महाराष्ट्र व्यंगचित्रकार ग्रुप, कार्टून कट्टा आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

2 × 5 =

error: Content is protected !!