बेळगाव येथील श्री ज्योतिर्लिंग देवस्थान दादा अष्टेकर भक्त मंडळ, नार्वेकर गल्ली येथील भक्तांची वैद्यनाथ दर्शनासाठी पायी दिंडी रवाना

बेळगाव येथील श्री ज्योतिर्लिंग देवस्थान दादा अष्टेकर भक्त मंडळ, नार्वेकर गल्ली येथील भक्तांची वैद्यनाथ दर्शनासाठी पायी दिंडी रवाना

बेळगाव येथील श्री ज्योतिर्लिंग देवस्थान दादा अष्टेकर भक्त मंडळ, नार्वेकर गल्ली यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही भाविकांची पायी दिंडी महिपाळगड येथील वैद्यनाथ देवाच्या दर्शनासाठी रवाना झाली. शनिवार दिनांक २ मे २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता बैलगाड्यांसह भक्तांनी प्रस्थान केले.

ही दिंडी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास वैद्यनाथ डोंगरावर पोहोचणार असून तेथे मुक्काम करण्यात येणार आहे. रविवार दिनांक ३ मे रोजी पहाटे ५ वाजता वैद्यनाथ देवाला दुग्धाभिषेक करण्यात येणार आहे. तसेच देवाला दवणा व गुलाल अर्पण करून खीर-भात व पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात येईल. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.

दर्शन व धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर भक्तगण संध्याकाळी परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत. चैत्र यात्रेनंतर वैद्यनाथ देवाला दवणा अर्पण करण्याची ही पूर्वापार चालत आलेली परंपरा असून भक्तगण ती आजही भक्तिभावाने जपत आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

10 − three =

error: Content is protected !!