सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यशाळा; सवलतीत प्रवेशाची सुवर्णसंधी

सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यशाळा; सवलतीत प्रवेशाची सुवर्णसंधी

आज, बुधवार (दि. २९ एप्रिल) रोजी आणि यांच्या वतीने सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी विविध अभ्यासक्रमांमध्ये सवलतीत प्रवेशाबाबत माहिती देण्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेत प्रा. डॉ. सुभाष कोंबडे, डॉ. कविता वड्राळे आणि डॉ. हर्षवर्धन पंडित यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर मध्यवर्तीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे व सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर उपस्थित होते.

यावेळी शिवाजी विद्यापीठाने २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी सीमाभागातील ८६५ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध करून देत विविध शुल्क सवलती जाहीर केल्या. अनुदानित अभ्यासक्रमांसाठी पूर्ण ट्यूशन फी माफ करण्यात येणार असून विनाअनुदानित अभ्यासक्रमांसाठी २५ टक्के फी सवलत देण्यात येणार आहे. तसेच वसतिगृहात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह शुल्कही पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे.

प्रवेश परीक्षेसह अभ्यासक्रमांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३ मे २०२६ असून परीक्षा १२ ते १५ मे दरम्यान होणार आहे. तर प्रवेश परीक्षेविना अभ्यासक्रमांसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ मे २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

एमएसडब्ल्यू, बीए, बीकॉम, बीएससी, एमए, एमएससी, एमकॉम, एमसीए, बीबीए, एमबीए, बीटेक, एमटेक आदी विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संधी असल्याचे सांगण्यात आले. तसेच शिक्षणासोबत नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याचा उपक्रमही विद्यापीठाच्या माध्यमातून राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी राखीव जागा, प्रवेश शुल्क व वसतिगृहात सवलतींचा लाभ घेण्याचे आवाहन विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले.

यावेळी युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्यासह दत्ता उघाडे, महेश जुवेकर, सूरज कुडूचकर, श्रीकांत कदम, संतोष कृष्णाचे, तुकेश पाटील, विजय जाधव, वासू सामजी, सुहास हुद्दार, किरण हुद्दार, उमेश पाटील, साईनाथ शिरोडकर, सूरज चव्हाण तसेच विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवराज पाटील यांनी केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

sixteen + three =

error: Content is protected !!