बेळगावात घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; सुमारे 67.93 लाखांचे सोने-चांदी जप्त

बेळगावात घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; सुमारे 67.93 लाखांचे सोने-चांदी जप्त


बेळगाव शहरातील विविध भागांत घरफोडी करून दागिने लंपास करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे. अमन नगर, उज्ज्वल नगर, मारुती नगर, शाहू नगर आणि वीरभद्र नगर या परिसरात घरांचे कुलूप तोडून आत प्रवेश करून सोने-चांदीचे दागिने चोरी करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणात पोलिसांनी एकूण पाच आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सुमारे 64,47,690 रुपयांचे 415.98 ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच 3,45,735 रुपयांचे 1329.75 ग्रॅम चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. एकूण जप्तीची किंमत सुमारे 67,93,425 रुपये इतकी आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. माळमारुती पोलिस ठाण्याच्या पथकाने ही यशस्वी मोहीम राबवली. तपास आणि अटकेच्या कारवाईत सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक करण्यात आले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 × four =

error: Content is protected !!