कंग्राळ गल्लीतील शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात; महिलांची पाळणगीते ठरली आकर्षण

कंग्राळ गल्लीतील शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात; महिलांची पाळणगीते ठरली आकर्षण

बेळगाव : शिवजयंती उत्सव मंडळ, कंग्राळ गल्ली यांच्या वतीने रविवार दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी सकाळी शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. परिसरात पारंपरिक वातावरणात साजऱ्या झालेल्या या कार्यक्रमात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.

कार्यक्रमादरम्यान गल्लीतील महिलांनी भावपूर्ण पाळणगीते सादर करून वातावरण भक्तिमय केले. या सोहळ्यास पंचमंडळातील मालोजीराव अष्टेकर, शंकर बडवाण्णाचे, अशोक कंग्राळकर, बाबुराव कुट्रे, अनंतराव पाटील, दौलत मोरे, परशराम दरवंदर, रमेश मोरे, उत्तम सांबरेकर यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष सुहास चौगुले, अभिजित अष्टेकर, बाबुराव इंगोले, गजानन सांबरेकर, प्रकाश पाटील, सौरभ पाटील, किरण बडवाण्णाचे, विनायक (खाटीक) सांबरेकर, महेश मोरे, सचिन चौगुले तसेच इतर सभासद व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी मोठ्या संख्येने महिला व बाळगोपाळांची उपस्थिती लाभली, ज्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

4 × one =

error: Content is protected !!