तुडये येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम व मान्यवरांचा सत्कार

तुडये येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम व मान्यवरांचा सत्कार

चंदगड : कोल्हापूर जिल्ह्यातील तुडये येथे भीमस्वराज्य युवक मंडळाच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी शुभम शेळके यांनी मनोगत व्यक्त करत, “छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले स्वराज्य पुढे नेण्याचे काम बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून केले. मनगटात शिवराय आणि डोक्यात भीमराव असतील तर आयुष्यात कुणासमोर झुकावे लागणार नाही,” असे सांगितले.

तुडये गाव व चंदगड तालुका सीमाभागातील जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, अशी ग्वाही ग्रामस्थांनी दिली. यावेळी व्यासपीठावर सभापती विलास नाईक, सरपंच विलास सुतार, माजी सभापती जगन्नाथ हुलजी, पंचायत समिती सदस्य सौ. प्रेमा हुलजी, तसेच मारुती पाटील, हनमंत पाटील, धनंजय पाटील, मनोहर हुंद्रे, अशोक घगवे, मोतेस बारदेसकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते

दरम्यान, सरपंच विलास सुतार यांना “लढा नाहीतर गुलामीची सवय होईल” हे ब्रीदवाक्य स्मृतिचिन्ह स्वरूपात देऊन आगामी मराठी सन्मान यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five × 5 =

error: Content is protected !!