बेळगाव : श्री राम सेना हिंदुस्थानतर्फे आयोजित बेळगाव हिंद केसरी स्पर्धा व भव्य बैलगाडी शर्यतीसाठी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार (दादा) पाटील यांनी आमंत्रण स्वीकारले आहे. ही स्पर्धा २४, २५ व २६ एप्रिल २०२६ रोजी बेळगाव येथे होणार आहे.
भारतामधील मोठ्या बैलगाडी शर्यतींपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धेच्या निमित्ताने चंद्रहार पाटील यांना विशेष निमंत्रण देण्यात आले. यावेळी श्याम गौंडाडकर, अनिकेत भोसले, युवराज पाटील, प्रीतम पाटील, युवराज देसाई, सुरज चोपडे, उदय बडेकर, आनंद देसाई तसेच प्रसिद्ध कुस्ती निवेदक जोतीराम वाजे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
