बेळगाव : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त येथील पायोनियर अर्बन बॅंकेच्या वतीने अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी बॅंकेच्या व्हाईस चेअरमन सुवर्णा शहापूरकर यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाला संचालक रणजीत चव्हाण पाटील, शिवराज पाटील, गजानन पाटील, गजानन ठोकणेकर, जानेश्वर सायनेकर तसेच सीईओ अनिता मूल्या आणि बॅंकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाद्वारे महामानवांच्या विचारांना उजाळा देत त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले.
