महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती टिळकवाडी येथील युवा समिती कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर व खजिनदार विनायक कावळे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमात बोलताना अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी बाबासाहेबांच्या विचारांचा उल्लेख करत “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा असल्याचे सांगितले. सीमाप्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्नशील राहणे गरजेचे असून बाबासाहेबांनी दिलेल्या लोकशाही मार्गावर चालत न्याय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी सरचिटणीस श्रीकांत कदम, उपाध्यक्ष वासू सामजी, विनायक कावळे, किरण हुद्दार, सुरज कुडूचकर, राकेश सावंत, महांतेश अलगोंडि, आकाश भेकणे, प्रतीक पाटील, महेश चौगुले, अश्वजीत चौधरी, विशाल गौंडाडकर आदी उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 + 14 =

error: Content is protected !!