बेळगाव : बेळगाव मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अंकुश केसरकर यांचा बॅनेन्स स्मिथ हायस्कूल मराठी मिडीयम बॅच 1986 च्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसंत संजय मोरे यांनी केसरकर यांच्या भावी वाटचालीसाठी शिवमय शुभेच्छा देत, त्यांच्या नेतृत्वाखाली शिवजयंती उत्सव अधिक भव्य स्वरूपात साजरा होईल, असा विश्वास व्यक्त केला.
या प्रसंगी बॅनेन्स स्मिथ हायस्कूल मराठी मिडीयम बॅच 1986 चे वर्गमित्र सुनील मुरकुटे, अमर कारेकर, परशुराम लोंढे, सुनील गुडमेटी, संजय देसाई, दिगंबर प्रभू, शिवसंत संजयजी मोरे, अजित मोरे, नागेश ढेगस्कर आदी उपस्थित होते.
