खानापूरच्या माजी आमदार डॉ अंजली हेमंत निंबाळकर या सध्या पक्ष संघटनेत महत्त्वाची भूमिका बजावत असून, त्यांच्या कामाची दखल पक्ष नेतृत्वाकडून घेतली जात असल्याचे स्पष्ट होत आहे.
सध्या त्या ऑल इंडिया काँग्रेस कमिटी (AICC) च्या सचिव पदावर कार्यरत असून त्यांच्याकडे पाँडिचेरी येथील अतिरिक्त निवडणूक जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या तिकीट वाटप प्रक्रियेत तसेच विविध पक्षांमधील जागा वाटपाच्या चर्चेतही त्यांचा सक्रिय सहभाग होता.
दरम्यान, आज पक्षाने जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत डॉ. निंबाळकर यांचे नाव ११व्या क्रमांकावर समाविष्ट करण्यात आले आहे. या समावेशामुळे त्यांच्या पक्षातील वाढत्या प्रभावाची पुन्हा एकदा पुष्टी झाली आहे.

पक्ष संघटनेत प्रामाणिकपणे व सातत्याने काम केल्यास पक्ष नेतृत्व त्याची दखल घेतो, हे या नियुक्तीद्वारे अधोरेखित झाले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी निष्ठेने काम करत राहावे, असा संदेशही यामधून मिळत आहे.
डॉ. अंजली निंबाळकर यांचे संघटनात्मक कार्य पुढील काळातही याच जोमाने सुरू राहणार असून, पक्षातील त्यांची भूमिका अधिक बळकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
