बेळगाव जिल्ह्यातील 18 राऊडी शीटर्सना तडीपार; पोलिसांचा मोठा धडक निर्णय

बेळगाव जिल्ह्यातील 18 राऊडी शीटर्सना तडीपार; पोलिसांचा मोठा धडक निर्णय

बेळगाव: जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 18 राऊडी शीटर्सना जिल्हाबाहेर तडीपार केले आहे. खून, खुनाचा प्रयत्न, मटका आणि इतर गुन्हेगारी प्रकरणांमध्ये सहभागी असलेल्या आरोपींवर ही कारवाई करण्यात आली आहे.

गुरुवारी पत्रकार परिषदेत माहिती देताना पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी सांगितले की, काही आरोपी सोशल मीडियावर “Tagaru Boys”, “Tiger Boys”, “Bad Boys” अशा नावांनी स्वतःची प्रतिमा तयार करत होते. पार्श्वसंगीतासह व्हिडिओ पोस्ट करून राऊडी संस्कृतीचे glorification केले जात होते.

“बेळगाव जिल्ह्यात अशा घटकांना अजिबात स्थान नाही. येथे फक्त चांगल्या मुलांनाच वाव आहे,” असा कडक इशारा एसपींनी दिला.

त्यांनी पुढे सांगितले की, या सर्व आरोपींचा गुन्हेगारी इतिहास असून त्यांच्या सोशल मीडियावरील कृत्यांचा समाजावर, विशेषतः तरुणांवर विपरीत परिणाम होत होता. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मागील एका महिन्यात ही तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.

तडीपार करण्यात आलेले आरोपी:

  • गंगप्पा नायक व संजू मेस्त्री (गोकाक सिटी) – 6 महिने
  • सागर खानापूर व पास्कल मुथुस्वामी (गोकाक ग्रामीण) – 6 महिने
  • दस्तगीर साब नवलगी (कुलगोडा) – 8 महिने
  • हनुमंत मदार (मुरगोड) – 1 वर्ष
  • नीलकंठ मनवाडकर – 6 महिने
  • सैफ अली नगरजी (निपाणी सिटी) – 1 वर्ष
  • सचिन चौडकण्णावर (संकश्वर) – 1 वर्ष
  • प्रवीण चौगुले (निपाणी सिटी) – 1 वर्ष
  • चंद्रकांत वड्डारा (निपाणी ग्रामीण) – 1 वर्ष
  • लाडजीसाब मुल्तानी (यमकनमरडी) – 1 वर्ष
  • परेश नशिपुडी – 8 महिने
  • चेतन नाईक्कर (कटकळा) – 3 महिने
  • हुसेन साब बिलागी (सावदत्ती) – 2 महिने
  • चुराचप्पा घटनूर (सुरेबाण) – 1 महिना
  • दीपक केळगडे (कित्तूर) – 6 महिने
  • कुमार बेंडिगेरी – 7 महिने

पोलिसांनी स्पष्ट केले की, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहणार आहेत. तसेच सोशल मीडियावर गुन्हेगारीचे समर्थन करणाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

19 − two =

error: Content is protected !!