बेळगाव : सदाशिवनगर परिसरात गेल्या दहा दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा न झाल्याने नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पाणीपुरवठ्यातील अनियमिततेमुळे त्रस्त झालेल्या रहिवाशांनी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांच्या नेतृत्वाखाली एल अँड टी कार्यालयाजवळ एकत्र येत आपली नाराजी व्यक्त केली.
यावेळी नागरिकांनी आमदार आसिफ सेठ यांनाही परिसरातील पाणीपुरवठ्याच्या समस्येबाबत माहिती दिली. त्यानंतर आमदारांनी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली.
दरम्यान, एल अँड टीचे अधिकारी केतन खांडेकर यांनी नागरिकांना वेळेवर आणि नियमित पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
या वेळी समाजसेवक प्रसाद चौगुले, जमील देसाई, विनोद बसघोड, गणपती करकी, पावशे, बापू चव्हाण, शरनु गांधीगुडी, अखिल देसाई, भोमानी पाटील, सुरेश हलवाई यांच्यासह परिसरातील इतर रहिवासी उपस्थित होते.
