बेळगाव : जाधव नगर येथील श्री गणेश मंदिराचा अक्षय तृतीया निमित्त २५ वा वर्धापन दिन विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त मंदिरात गणहोम, पूजन तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
हे मंदिर बेळगाव शहरातील माजी आमदार कैलासवासी श्री नारायणराव तरळे यांच्या अथक प्रयत्नातून व जाधव नगर परिसरातील नागरिकांच्या सहकार्याने उभारण्यात आले आहे. अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर रविवारी येथे गणहोमसह विविध धार्मिक विधी पार पडले.
या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. श्री गणेश सेवा अभिवृद्धी संघातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मंडळाचे अध्यक्ष डॉ. पी. डी. काळे, उपाध्यक्ष नितीन जाधव, सचिव सुधीर देसाई तसेच कार्यकर्ते दीपक तरळे, अशोक घोरपडे, मदन जाधव, उमेश एम. पाटील, अनिल हुकेरी, सौरभ पाटील, गजानन गोवेकर, आय. एन. बिलावी ,डॉ. श्रावगे आणि कार्यकर्ते , महिलावर्ग यांच्या परिश्रमातून हा रौप्यमहोत्सवी सोहळा यशस्वीरीत्या पार पडला.
