एसटीएमच्या आई भवानी देवीला श्री एकदंत युवक मंडळातर्फे चांदीचे हार अर्पण

एसटीएमच्या आई भवानी देवीला श्री एकदंत युवक मंडळातर्फे चांदीचे हार अर्पण

बेळगाव : समर्थ नगर येथील श्री एकदंत युवक मंडळ आणि एसटीएम संचलित श्री दुर्गाशक्ती महिला मंडळाच्या वतीने एसटीएमच्या आई भवानी देवीला चांदीचे हार अर्पण करून भक्तिभावाने ओटी भरण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मंगळवार, दि. १३ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी झालेल्या या धार्मिक कार्यक्रमामुळे समर्थ नगर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी मंडळाच्या वतीने आई भवानी देवीची विधिवत पूजा करून ओटी भरण्यात आली आणि चांदीचे हार अर्पण करण्यात आले. त्यानंतर समर्थ नगर कॉर्नर येथील श्री रेणुका देवी मंदिर तसेच समर्थ नगरमधील जागृत श्री ब्रह्मदेव मंदिर येथेही ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडला.

या धार्मिक सोहळ्यात परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. पारंपरिक वेशभूषा परिधान करून महिला कळस, गिडी आणि आरती घेऊन मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. अनेक मुलींनी देवीचे रूप धारण करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. मिरवणुकीदरम्यान विविध देवतांचा जयघोष करण्यात आला.

भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यात समर्थ नगरमधील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. शेवटी महाआरती करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. श्री एकदंत युवक मंडळ आणि श्री दुर्गाशक्ती महिला मंडळाच्या वतीने आयोजित या धार्मिक उपक्रमाला परिसरातील भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five × two =

error: Content is protected !!