बेळगाव : शहर व उपनगरातील शिवजयंती उत्सवाच्या भव्य आणि आकर्षक साजरीकरणासाठी ओळखल्या जाणाऱ्या शिवजयंती चित्ररथ महामंडळ तर्फे आज (रविवार, ११ एप्रिल) महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक धर्मवीर संभाजीराजे चौक येथील दुर्गादेवी मंदिर, जत्तीमठ येथे सकाळी ११ वाजता होणार आहे.
दरवर्षी शिवजयंती उत्सवानिमित्त बेळगावकरांना शिवरायांच्या जीवनातील विविध प्रसंगांचे सजीव देखावे (चित्ररथ) पाहायला मिळतात. या पारंपरिक आणि भव्य सोहळ्याच्या नियोजनासाठी ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
बैठकीत शिवजयंती चित्ररथ स्पर्धा आयोजित करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असून, चित्ररथ मिरवणुकीच्या मार्गावरील अडचणी, विविध उत्सव मंडळांसमोरील समस्या तसेच पोलीस आयुक्तांनी दिलेल्या सूचनांवर सविस्तर चर्चा होणार आहे.
या बैठकीला शहर व उपनगरातील सर्व शिवजयंती उत्सव मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष सुनील जाधव, साहित्यिक गुणवंत पाटील, सरचिटणीस जे. बी. शाहपूरकर तसेच उपाध्यक्ष प्रसाद मोरे, संतोष कणेरी, रवींद्र जाधव, विनायक बावडेकर, अरुण पाटील, निहाल शहपूरकर, आदित्य पाटील आणि आकाश हांडे यांनी केले आहे.
#Belgav #BedhadakBelgav
