संध्या किरण सेवा केंद्रात ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम उत्साहात

संध्या किरण सेवा केंद्रात ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम उत्साहात

बेळगाव | बेधडक बेळगाव वृत्तसेवा

बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्राच्या वतीने ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम सोमवारपेठ, टिळकवाडी येथील डॉ. नीता देशपांडे डायबेटिस सेंटर येथे उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या व्यासपीठावर सोसायटीचे अध्यक्ष विश्वास धुराजी, प्रमुख पाहुणे घुमटमाळ मारुती देवस्थानचे उपाध्यक्ष गोपाळ बिर्जे, उपाध्यक्ष के. एल. मजूकर, कार्यवाह सुरेंद्र देसाई, सहकार्यवाह शिवराज पाटील, विजय वाईगडे आणि विठ्ठल पोळ उपस्थित होते.

यावेळी प्रमुख पाहुणे गोपाळ बिर्जे यांनी ज्येष्ठ नागरिकांना उत्तम आरोग्यासाठी सकारात्मक विचार, आहारावर नियंत्रण तसेच हलका व नियमित व्यायाम करण्याचा सल्ला दिला. मन प्रसन्न ठेवण्याबरोबरच मानसिक आरोग्याची काळजी घेणे आणि सामाजिक भान जपणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सोसायटीला पाच हजार रुपयांची देणगी दिली.

कार्यक्रमात अनंत सावंत यांनी प्रार्थना सादर केली. त्यानंतर रविंद्रनाथ जुवळी, विजय वाईगडे, सतीश देशपांडे, स्वाती माने, मधू वाळवेकर, योगिनी देसाई, पी. एन. रायबागी, महेश अणवेकर, एम. एस. हुद्दार, भारती गावडे, अशोक कदम, प्रकाश कुडतरकर, अवधुत शेट्ये, अश्विनी पाटील आणि विजयमाला पाटील यांनी मराठी, हिंदी आणि कन्नड गाणी सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले.

पितृपक्षानिमित्त भरत गावडे यांनी सादर केलेली ‘कावळा’ ही कविता विशेष दाद मिळवून गेली.

यावेळी सोसायटीचे आजीव सभासद बाळासाहेब खासबाग यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

कार्यक्रमाचे स्वागत सुरेंद्र देसाई यांनी केले. पाहुण्यांची ओळख शिवराज पाटील यांनी करून दिली, तर विठ्ठल पोळ यांनी आभार मानले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five × 3 =

error: Content is protected !!