रणझुंझार को-ऑप. क्रेडिट सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात
निलजी : प्रतिनिधी
मुलांच्या नकारात्मक गोष्टींचा बाऊ न करता त्यांच्या बुद्धीला सकारात्मकतेची वाट दाखवली पाहिजे. तरच भविष्यात ते उत्तम नागरिक म्हणून घडतील. आजच्या काळात पालक आणि मुलांमधील संवाद कमी होत चालला असून, त्यामुळे कुटुंबातील वाद वाढत आहेत. पालकांनी मुलांशी अधिकाधिक संवाद साधून त्यांच्या आवडीनिवडी आणि अडचणी समजून घेतल्या पाहिजेत. यातून कुटुंबातील जिव्हाळा आणि प्रेम वाढून सकारात्मकतेला बळ मिळेल, असे प्रतिपादन प्राध्यापिका डॉ. संजीवनी खंडागळे यांनी केले.
निलजी येथील रणझुंझार को-ऑप. क्रेडिट सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा गुणगौरव सोहळा संयुक्तपणे रणझुंझार हायस्कूलच्या कै. अशोकराव मोदगेकर सभागृहात उत्साही वातावरणात पार पडला. यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून डॉ. संजीवनी खंडागळे बोलत होत्या.
आज कृत्रिम बुद्धिमत्तेचे युग असून विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञान हाताळण्याचे कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे. बदलत्या काळानुसार स्वतःला सक्षम बनविले पाहिजे. सध्याचा काळ स्पर्धेचा असल्याने विद्यार्थ्यांनी कठोर मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपले ध्येय साध्य करावे. त्याचबरोबर विविध कलाही जोपासाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विठ्ठल पाटील होते, तर प्रमुख पाहुण्या म्हणून रणझुंझार शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा विमलताई मोदगेकर उपस्थित होत्या.
प्रारंभी रणझुंझार हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन सादर केले. त्यानंतर विद्यार्थिनींच्या स्वागतगीताने प्रमुख अतिथी, सभासद आणि उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. डॉ. संजीवनी खंडागळे, रमेश मोदगेकर, प्रकाश धानगावडे, चंदा गाडेकर, निर्मला गोमाणाचे, अमर मोदगेकर, सिद्राय वर्पे आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
रणझुंझार सौहार्द सोसायटीच्या संचालिका उज्वला पाटील यांच्या हस्ते सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संस्थेचे संस्थापक स्व. अशोकराव मोदगेकर यांच्या प्रतिमेला सोसायटीचे उपाध्यक्ष सिद्राय पाटील यांनी पुष्पहार अर्पण केला. प्रमुख अतिथी डॉ. संजीवनी खंडागळे यांचा रणझुंझार शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा विमलताई मोदगेकर यांच्या हस्ते शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना उपस्थित संचालक, सल्लागार आणि मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
संस्थे
