बेळगाव : ‘फिट इंडिया, स्ट्रॉंग इंडिया’ आणि ‘स्केट इंडिया, फिट इंडिया’ या उपक्रमांतर्गत राजहंस गड येथे आयोजित स्केटिंग स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत सुमारे 150 हून अधिक नामांकित स्केटर्स सहभागी झाले होते.
राजहंस गावातील कमानीपासून गडाच्या पायथ्यापर्यंत सुमारे 2 किलोमीटर अंतरावर ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस वितरण समाजसेवक तथा पंच कमिटी सदस्य बसवंत पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महादेव चव्हाण, सिद्धप्पा नाईक, वालीकर, महादेव पवार, महेश कुंडेकर यांच्यासह विविध भागांतून आलेले स्पर्धक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
विजेते स्पर्धक पुढीलप्रमाणे :
🔹 14 वर्षांवरील मुले:
सौरभ साळोखे (प्रथम), अद्वित घाटगे (द्वितीय), पलाश (तृतीय), सत्यम पाटील (चौथा), सिद्धार्थ पाटील (पाचवा)
🔹 14 वर्षांखालील मुले:
अवनीश कामननवर (प्रथम), कुलदीप बिर्जे (द्वितीय), सार्थक चव्हाण (तृतीय), सर्वेश पाटील (चौथा), आर्या कदम (पाचवा)
🔹 14 वर्षांखालील मुली:
जोये (प्रथम), अमिषा वेर्णेकर (द्वितीय), प्रांजल पाटील (तृतीय), एव्हरील मोर्सी (चौथा), आरोही व इलेवरा रॉड्रिग्ज (पाचवा)
🔹 14 वर्षांवरील मुली:
ब्लॉसम (प्रथम), वेदिका (द्वितीय), मुदालसिका मुलाणी (तृतीय), जानवी तेंडुलकर (चौथा)
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी योगेश कुलकर्णी, विठ्ठल गंगणे, ऋषिकेश पसारे, सुरज शिंदे, विनायक पाटील, सोहम हिंडलगेकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
