मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार सन्मान; अर्ज करण्याचे आवाहन

मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार सन्मान; अर्ज करण्याचे आवाहन

बेळगाव : मराठा समाज सुधारणा मंडळाच्या वतीने यंदाच्या दहावी आणि बारावी परीक्षेत 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. समाजातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी लवकरच विशेष गौरव समारंभाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली.

बेळगाव शहर आणि तालुक्यातील पात्र विद्यार्थ्यांनी आपली गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत, आयडेंटिटी आकाराचा फोटो, संपूर्ण पत्ता आणि व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक यांसह अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

सदर कागदपत्रे मराठा समाज सुधारणा मंडळ कार्यालय, मेलगे गल्ली, शहापूर (वेळ सकाळी ११ ते दुपारी १.३०), मधू कणबर्गी, शंकर बेकरीच्या बाजूला, किर्लोस्कर रोड तसेच धनश्री सोसायटी, अनगोळ रोड, अनगोळ येथे दि. 31 मे पर्यंत जमा करावीत.

अधिक माहितीसाठी मंडळाचे कार्याध्यक्ष शिवराज पाटील (9845960531) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

18 − eleven =

error: Content is protected !!