बेळगाव : प्रतिनिधी
खडे बाजार, बेळगाव येथील श्री नामदेव दैवकी संस्थेच्या वतीने सालाबादप्रमाणे कार्तिक महिन्यानिमित्त श्री संत नामदेव मंदिरात सोमवार, दि. २६ ऑक्टोबरपासून काकड आरती, भजन आणि अभिषेक कार्यक्रमाला प्रारंभ होत आहे.
मंदिरात दररोज सकाळी ६.१५ ते ८.३० या वेळेत काकड आरती, भजन आणि अभिषेकाचे आयोजन करण्यात येणार आहे. या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी अभिषेक व काकड आरतीची नोंदणी सुरू करण्यात आली आहे.
इच्छुक भाविकांनी श्री विकास उरणकर (पुजारी) किंवा श्री अमर कोपार्डे यांच्याकडे आपली नावे नोंदवावीत, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रमासंदर्भात संस्थेच्या संचालक मंडळाकडून नवीन मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या असून, भाविकांनी त्यांचे पालन करावे, असेही कळविण्यात आले आहे.
श्री नामदेव दैवकी संस्थेचे अध्यक्ष, सचिव आणि कार्यकारी मंडळाने सर्व भाविकांनी या धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.
