बेळगाव : येथील हुतात्मा चौक गणेश मंडळाच्या गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ मंडळाचे अध्यक्ष श्री. अशोक पोतदार यांच्या हस्ते विधिवत पूजन करून पार पडली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मंडळाचे प्रेरणास्थान कै. रामकुमार जोशी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी मंडळाच्या अहवालाचे प्रकाशनही करण्यात आले.
याप्रसंगी अशोक पोतदार यांनी, दरवर्षीप्रमाणे यंदाचाही गणेशोत्सव सर्वांच्या सहभागातून शिस्तबद्ध व धार्मिक वातावरणात उत्साहात पार पाडला जाईल, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाला शाम सुतार, शेखर हंडे, राजकुमार कलघटगी, महेंद्र पोरवाल, लक्ष्मीकांत जाधव, विजय मोहिते, संजय चौगुले, अमोल बेदरे, दिलीप पाटील, अशोक नाईक, अशोक कलबुर्गी, चंदू कोलकर, यश हंडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन शिवाजी हंडे यांनी केले.
