हिंदवी स्वराज्य सार्वजनिक गणेशोत्सव युवक मंडळातर्फे सायबर क्राईम व बाल-महिला सुरक्षेबाबत जनजागृती

हिंदवी स्वराज्य सार्वजनिक गणेशोत्सव युवक मंडळातर्फे सायबर क्राईम व बाल-महिला सुरक्षेबाबत जनजागृती

बेळगाव : लास्ट बस स्टॉप, सदाशिवनगर येथील हिंदवी स्वराज्य सार्वजनिक गणेशोत्सव युवक मंडळातर्फे सायबर क्राईम, महिला व मुलांचे संरक्षण तसेच चाइल्ड हेल्पलाइन क्रमांकाबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात आली.

सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांच्या पुढाकाराने आयोजित या जनजागृती मोहिमेत नागरिकांना सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्याबाबत तसेच महिला आणि मुलांच्या सुरक्षेसंदर्भातील महत्त्वाची माहिती देण्यात आली. सायबर फसवणूक झाल्यास किंवा संशयास्पद प्रकार आढळल्यास योग्य वेळी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी पोलीस कर्मचारी, मंडळाचे अध्यक्ष भूषण पाटील, सुनील पम्मार, करण पाटील, संकेत भोसले, प्रसाद लोंढे, महिला मंडळाच्या प्रमुख लता माने यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांचा सत्कार करण्यात आला. सायबर क्राईम तसेच महिला व बालसुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराचे उपस्थित पोलीस कर्मचारी, नागरिक आणि एपीएमसी पोलीस यांच्या वतीने कौतुक करण्यात आले.

गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक कार्यक्रमांसोबतच सामाजिक जनजागृतीचे उपक्रम राबविण्याच्या मंडळाच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

7 + 1 =

error: Content is protected !!