महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कारप्राप्त गजानन लाड यांचा मच्छेत विविध संस्थांतर्फे सत्कार

महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कारप्राप्त गजानन लाड यांचा मच्छेत विविध संस्थांतर्फे सत्कार

मच्छे : गावचे सुपुत्र आणि नुकतेच ‘महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार’ प्राप्त उद्योजक गजानन लाड यांचा मच्छे येथे विविध संस्थांतर्फे उत्साहात सत्कार करण्यात आला.

मच्छे येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मारुती गल्ली यांच्या वतीने गजानन लाड यांना आरतीचा मान देण्यात आला. लाड हे पत्नीसमवेत आरतीस उपस्थित होते. आरतीनंतर मंडळाचे अध्यक्ष विनायक चौगुले यांच्या हस्ते लाड यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी श्री बाल शिवाजी सार्वजनिक वाचनालय, मच्छे यांच्या वतीने अध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यकारिणी सदस्यांच्या उपस्थितीत शिल्ड व पुस्तक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच महाराष्ट्र एकीकरण युवा समिती यांच्या वतीनेही शिल्ड व पुष्पगुच्छ देऊन गजानन लाड यांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार संभाजी कंणबरकर, अमोल लाड, साईनाथ शिरोडकर, बजरंग धामनेकर आणि गजानन छप्रे यांच्या हस्ते करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना गजानन लाड यांनी आपल्या संघर्षमय जीवनप्रवासातील अनेक अनुभव उपस्थितांसमोर मांडले. आपल्या यशाचे श्रेय त्यांनी तब्बल १४ वर्षे कार्य केलेल्या Polyhydron कंपनीचे संस्थापक स्वर्गीय सुरेश हुंदरे सर यांच्या प्रेरणा, मार्गदर्शन आणि शिकवणीला दिले.

“महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार हा माझ्यासाठी सन्मान आहे; मात्र त्यामागे माझ्या गुरूंचे आशीर्वाद आणि त्यांनी दिलेले अनमोल ज्ञान आहे,” अशी भावना लाड यांनी व्यक्त केली.

यावेळी युवकांना मार्गदर्शन करताना त्यांनी “पैसे कमावताना आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. पैसा महत्त्वाचा आहेच, पण आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे,” असा मोलाचा संदेश दिला.

कार्यक्रमास मारुती गल्लीतील गणेशभक्त तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

16 + 8 =

error: Content is protected !!