इंडियन कराटे क्लबच्या चार विद्यार्थ्यांना ब्लॅक बेल्ट प्रदान

इंडियन कराटे क्लबच्या चार विद्यार्थ्यांना ब्लॅक बेल्ट प्रदान

बेळगाव : इंडियन कराटे क्लब व बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे संघटनेच्या वतीने आयोजित ब्लॅक बेल्ट व कलर बेल्ट परीक्षा नुकतीच उत्साहात पार पडली. दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी तहसीलदार गल्ली येथील श्री सोमनाथ मंदिर कार्यालयात झालेल्या या परीक्षेत एकूण ७५ कराटेपटूंनी सहभाग घेतला.

या परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करत वर्धन चौगुले, सायली गुंडकल, समीक्षा गुंडकल आणि जानवी मासमर्डी या चार विद्यार्थ्यांना ब्लॅक बेल्ट प्रदान करण्यात आला. गेल्या आठ वर्षांपासून हे विद्यार्थी सोमनाथ मंदिर, तहसीलदार गल्ली येथील कराटे वर्गात नियमित सराव करत असून त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धांमध्ये सहभागी होत विविध पदकेही पटकावली आहेत.

या विद्यार्थ्यांचा सत्कार इंडियन कराटे क्लब व बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे संघटनेचे अध्यक्ष गजेन्द्र काकतीकर यांच्या हस्ते ब्लॅक बेल्ट, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांच्या पालकांचाही शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

या चारही विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षक विनायक दंडकर यांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण लाभले आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सोनाली सरनोबत, किरण जाधव (भाजप नेते), मिलिंद भातकांडे (प्रेसिडेंट, भातकांडे स्कूल) आणि एकलव्य पुरस्कार विजेते जलतरणपटू राजेश गजानन शिंदे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी इंडियन कराटे क्लबचे परशुराम काकती, प्रभाकर किल्लेकर, विठ्ठल भोजगार, श्रेया येळूरकर, सिद्धार्थ तहसीलदार, अमिषा होणगेकर, सात्विक शानभाग, वैष्णवी होणगेकर, तेजस्विनी देसाई यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन (पिंटू) भरमा पाखरे यांनी केले.

ब्लॅक बेल्ट प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

2 × five =

error: Content is protected !!