बेळगाव, दि. १४ ऑगस्ट : स्वातंत्र्यदिन २०२६ निमित्त उत्कृष्ट व उल्लेखनीय सेवेसाठी बेळगाव शहर पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांचा विविध सन्मानांनी गौरव करण्यात आला आहे.
माळमारुती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (PI) बी. आर. गड्डेकर यांना कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हे प्रतिबंध, गुन्ह्यांचा छडा लावणे तसेच सायबर गुन्ह्यांच्या प्रभावी तपासातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन “राष्ट्रपती प्रशंसनीय सेवा पदक” (President’s Medal for Meritorious Service) प्रदान करण्यात आले आहे.
तसेच उत्कृष्ट सेवेसाठी आरपीआय जाफर साब हैशेच (CCR), एएसआय संजीवकुमार कुराडे (शहर विशेष विभाग) आणि एचसी-१३८५ महादेव काशीद (सीसीआरबी, तांत्रिक विभाग) यांना २०२५-२६ सालचा “DG & IGP Commendation Disc” हा प्रतिष्ठेचा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.
बेळगाव शहर पोलिस आयुक्तालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, या चारही अधिकाऱ्यांच्या उल्लेखनीय सेवेमुळे बेळगाव शहर पोलिस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून त्यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
