दौलतच्या थकीत बिलासाठी दि. २४ रोजी सीमाभागातील शेतकऱ्यांची बैठक

दौलतच्या थकीत बिलासाठी दि. २४ रोजी सीमाभागातील शेतकऱ्यांची बैठक

बेळगाव : हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत सहकारी साखर कारखान्याला २०१०-११ या गळीत हंगामात ऊस पुरवठा केलेल्या सीमाभागातील शेतकऱ्यांची बैठक सोमवार, दि. २४ रोजी सकाळी ११ वाजता उचगाव येथील मार्कंडेय नदीवरील गणेश मंदिरात आयोजित करण्यात आली आहे.

बेळगाव व खानापूर परिसरातील २५० हून अधिक शेतकऱ्यांनी २०१०-११ मध्ये तासगावकर यांच्या ताब्यात दौलत कारखाना असताना ऊस पुरवठा केला होता. मात्र, या शेतकऱ्यांची ऊस बिले अद्याप मिळालेली नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

चंदगड व गडहिंग्लज परिसरातील शेतकऱ्यांना ऊस बिलांचा भरणा करण्यात आला आहे. मात्र, सीमाभागातील शेतकरी अद्याप थकीत बिलांपासून वंचित असल्याचे सांगण्यात आले.

या प्रलंबित बिलांबाबत सध्याच्या कारखाना प्रशासनाची भेट घेऊन चर्चा करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी पुढील भूमिका ठरविण्याच्या उद्देशाने ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

२०१०-११ मध्ये दौलत कारखान्याला ऊस पुरवठा केलेल्या सर्व शेतकऱ्यांनी बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन हेमंत पाटील, प्रवीण चांदीलकर आणि यशवंत पाटील यांनी केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four × four =

error: Content is protected !!