चलवेनहट्टी येथे ब्रम्हलिंग मंदिराचा वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन.

चलवेनहट्टी येथे ब्रम्हलिंग मंदिराचा वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन.

बेळगाव : चलवेनहट्टी येथे ब्रम्हलिंग मंदिराचा तिसरा वर्धापनदिन सोहळा ४ व ५ मे रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. २०२३ साली नव्याने बांधण्यात आलेल्या मंदिराच्या वास्तूशांती सोहळ्यानंतर ब्रम्हलिंग देवस्थान जिर्णोद्धार समिती व ग्रामस्थांनी दरवर्षी मे महिन्यात दोन दिवस वर्धापनदिन साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. त्या अनुषंगाने दरवर्षी हा सोहळा उत्साहात पार पडत असून यंदाही मोठ्या प्रमाणात भाविकांची उपस्थिती अपेक्षित आहे.

या यात्रेनिमित्त गावात सणासुदीचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिकांसह कामानिमित्त बाहेरगावी राहणारे नागरिकही मोठ्या संख्येने गावात दाखल होत आहेत.

सोहळ्याच्या पहिल्या दिवशी, ४ मे रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत स्वराली संगीत कला मंच यांच्या वतीने संगीत भजनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर चलवेनहट्टी येथील ब्रम्हलिंग भजनी मंडळ यांचा भजन कार्यक्रम सादर होईल.

दुसऱ्या दिवशी, ५ मे रोजी पहाटे ६ वाजता मंदिरात अभिषेक करण्यात येणार असून त्यानंतर मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले करण्यात येईल. सकाळी संगीत भजनाचे कार्यक्रम होतील. दुपारी ‘राजा पंढरीचा’ महिला हरीपाठ मंडळाच्या वतीने हरीपाठ आयोजित करण्यात आला आहे. तसेच दुपारी १२ वाजता महाप्रसादास सुरुवात होणार आहे.

या वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त समस्त भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा तसेच विविध धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन ब्रम्हलिंग देवस्थान जिर्णोद्धार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

12 + 1 =

error: Content is protected !!