भारत विकास परिषदेतर्फे ‘गुरुवंदना-छात्र अभिनंदन’ कार्यक्रम उत्साहात; २५ शिक्षकांसह ५० विद्यार्थ्यांचा गौरव

भारत विकास परिषदेतर्फे ‘गुरुवंदना-छात्र अभिनंदन’ कार्यक्रम उत्साहात; २५ शिक्षकांसह ५० विद्यार्थ्यांचा गौरव

बेधडक बेळगाव वृत्तसेवा | बेळगाव

भारत विकास परिषदेतर्फे आयोजित ‘गुरुवंदना-छात्र अभिनंदन’ कार्यक्रम संत मीरा शाळेच्या माधव सभागृहात रविवारी सायंकाळी उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात शहरातील विविध शाळांमधील २५ उत्कृष्ट शिक्षकांना मानपत्र, शाल व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच ५० गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींना उत्कृष्ट छात्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाला आमदार अभय पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. उद्योजक चंद्रशेखर इटी आणि ओमेगा ऑफसेटचे रफीक हिराणी यांची गौरव अतिथी म्हणून उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक वंदे मातरम् गायनाने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते भारतमाता आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. भारत विकास परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. राष्ट्रीय महिला कार्यकारिणी सदस्या स्वाती घोडेकर यांनी परिषदेच्या निःस्वार्थ सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक सेवाकार्याची माहिती उपस्थितांना दिली.

यानंतर मान्यवरांच्या हस्ते विविध शाळांमधून निवड झालेल्या २५ उत्कृष्ट शिक्षकांना सन्मानपत्र, शाल व स्मृतिचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले. तसेच शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल ५० विद्यार्थी-विद्यार्थिनींना प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमात शहरातील ज्योती सेंट्रल स्कूल, के.एल.एस. स्कूल, लव्ह डेल सेंट्रल स्कूल, ज्ञान प्रबोधन मंदिर, सरस्वती गर्ल्स हायस्कूल, जी.जी. चिटणीस इंग्लिश माध्यम स्कूल, बालिकादर्श विद्यालय, ठळकवाडी हायस्कूल, एम.व्ही. हेरवाडकर स्कूल, बी.के. मॉडेल हायस्कूल, उषाताई गोगटे हायस्कूल, व्ही.एन. शिवणगी स्कूल, अमृता विद्यालयम्, संत मीरा इंग्लिश माध्यम स्कूल अनगोळ, एम.व्ही.एम. प्रभाताई देशपांडे इंग्रजी माध्यम स्कूल, महिला विद्यालय मराठी माध्यम हायस्कूल, संत मीरा स्कूल हिंडलगा, व्ही.एम. शानभाग हायस्कूल, एम.आर. भंडारी स्कूल, स्वाध्याय विद्यामंदिर, भरतेश इंग्रजी माध्यम स्कूल, मुक्तांगण विद्यालय, व्ही.बी.एस.एस. हायस्कूल, शारदा विद्यालय आणि जीवनज्योती इंग्रजी माध्यम स्कूल या शाळांमधील शिक्षक व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रतिभा हल्लेप्पनवर यांनी केले. प्रिया पाटील आणि जया नायक यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. प्रांत संघटन सचिव विनायक घोडेकर यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

यावेळी भारत विकास परिषदेचे प्राचार्य व्ही.एन. जोशी, डी.वाय. पाटील, पांडुरंग नायक, सुहास गुर्जर, डॉ. जे.जी. नाईक, विजेंद्र गुडी, रामचंद्र तिगडी, पी.एम. पाटील, पी.जे. घाडी, ॲड. बना कौजलगी, विद्या इटी, रजनी गुर्जर, अक्षता मोरे, मंगल कुलकर्णी यांच्यासह निमंत्रित, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

14 − 7 =

error: Content is protected !!