वडगाव : सालाबादप्रमाणे यंदाही चावडी गल्ली, वडगाव येथे स्वकुळ साळी समाजाच्या वतीने भगवान श्री जिव्हेश्वर उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांसह उत्सवाची सांगता होणार आहे.
या उत्सवानिमित्त रविवार, दि. १६ ऑगस्टपासून २५ ऑगस्टपर्यंत दररोज सायंकाळी भगवान श्री जिव्हेश्वर यांच्या पोथी (ग्रंथ) वाचनाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच मंदिरात दररोज सायंकाळी आरती, भजन तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.
मंगळवार, दि. २५ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता भगवान श्री जिव्हेश्वर यांचा जन्मकाळ धार्मिक विधींनी साजरा करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी १२ ते ३ या वेळेत भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. महाप्रसादानंतर यंदाच्या उत्सवाची सांगता होणार आहे.
या धार्मिक उत्सवात परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन भगवान श्री जिव्हेश्वर यांचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्वकुळ साळी समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
