भूतानमध्ये बेळगावच्या प्रशांत खन्नूकर यांची दमदार कामगिरी; साऊथ एशियन चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदकाची कमाई

भूतानमध्ये बेळगावच्या प्रशांत खन्नूकर यांची दमदार कामगिरी; साऊथ एशियन चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदकाची कमाई

बेळगाव : बेळगावचे सुपुत्र प्रशांत खन्नूकर यांनी भूतान येथे पार पडलेल्या १६व्या साऊथ एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत रौप्य पदक (सिल्वर मेडल) पटकावले. त्यांच्या या आंतरराष्ट्रीय यशामुळे बेळगावसह संपूर्ण देशाची मान अभिमानाने उंचावली आहे.

क्रीडा क्षेत्रातील या उल्लेखनीय यशाबद्दल Supplement City मित्रमंडळ यांच्या वतीने प्रशांत खन्नूकर यांचा सत्कार करण्यात आला. खेळाडूंचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन देण्याचा हा उपक्रम उपस्थितांकडून कौतुकास पात्र ठरला.

यावेळी वक्त्यांनी सांगितले की, स्थानिक पातळीवर मिळणारे प्रोत्साहन आणि सन्मान हे खेळाडूंना अधिक मेहनत घेण्याची प्रेरणा देतात. अशा गौरवामुळे युवा खेळाडूंनाही क्रीडा क्षेत्रात मोठी कामगिरी करण्याची उमेद मिळते.

प्रशांत खन्नूकर यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, आगामी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये ते सुवर्णपदकाची कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. तसेच खेळाडूंना सातत्याने प्रोत्साहन देणाऱ्या Supplement City मित्रमंडळाचेही यावेळी विशेष कौतुक करण्यात आले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

seven + two =

error: Content is protected !!