कर्मचाऱ्यांसाठी ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे विशेष प्रक्षेपण

कर्मचाऱ्यांसाठी ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे विशेष प्रक्षेपण

बेळगाव : “छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखा दुसरा राजा झाला नाही आणि होणारही नाही. त्यांच्या जीवनातील काही गोष्टी जरी आपण आत्मसात केल्या, तर आपले जीवन नक्कीच समृद्ध होईल,” असे विचार उद्योगपती शिरीष गोगटे यांनी व्यक्त केले.

गोगटे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजशी संलग्न विविध आस्थापनांमधील सुमारे दीडशे कर्मचाऱ्यांसाठी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचे विशेष प्रक्षेपण आयोजित करण्यात आले होते. या निमित्ताने सर्व कर्मचाऱ्यांना नर्तकी-स्वरूप सिनेमागृहात घेऊन जाण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज तसेच लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शिरीष गोगटे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसमोर शिवरायांची महती सांगत त्यांच्या विचारांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले.

या प्रसंगी नर्तकी-स्वरूप सिनेमागृहाचे संचालक अविनाश पोतदार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तसेच ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट पहिल्या दिवसापासून हाऊसफुल चालत असल्याची माहिती त्यांनी दिली.

चित्रपट पाहिल्यानंतर उपस्थित कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त करत अशा उपक्रमांचे स्वागत केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eighteen − seven =

error: Content is protected !!