राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत महिला विद्यालयच्या अद्वैत पवारला सुवर्णपदक

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत महिला विद्यालयच्या अद्वैत पवारला सुवर्णपदक

बेळगाव – कर्नाटक राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे आयोजित २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत बेळगावच्या महिला विद्यालय हायस्कूलचा विद्यार्थी अद्वैत प्रशांत पवार याने कराटे स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले.

देवनहळ्ळी, बेंगळुरू ग्रामीण येथे २१ नोव्हेंबर २०२६ रोजी झालेल्या या स्पर्धेत अद्वैतने १४ ते १५ वर्षे वयोगटातील ६० किलोवरील वजन गटात सहभाग घेतला होता. या गटात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत त्याने प्रतिस्पर्ध्यांवर मात करून प्रथम क्रमांक मिळविला.

अद्वैतच्या या यशामुळे महिला विद्यालय हायस्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून बेळगावच्या क्रीडा क्षेत्राचाही गौरव झाला आहे.

त्याच्या या यशाबद्दल शाळेचे शिक्षक, क्रीडा प्रशिक्षक, कुटुंबीय, मित्रपरिवार आणि क्रीडाप्रेमींकडून अभिनंदन करण्यात येत आहे. अद्वैतच्या पुढील क्रीडा कारकिर्दीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

one × 3 =

error: Content is protected !!