सांबरा सरकारी मराठी शाळेचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव उत्साहात साजरा करण्याचा निर्णय

सांबरा सरकारी मराठी शाळेचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव उत्साहात साजरा करण्याचा निर्णय

बेळगाव : सांबरा येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेला १५० वर्षे पूर्ण होत असल्याने शाळेचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव अपूर्व उत्साहात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात शाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी एसडीएमसी अध्यक्ष लक्ष्मण जोई होते.

यावेळी सुवर्णमहोत्सवाच्या आयोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पुढील बैठकीत कार्यक्रमाची तारीख आणि संपूर्ण रूपरेषा निश्चित करण्याबरोबरच विविध समित्यांची स्थापना करण्याचे ठरविण्यात आले. राजकीय पक्षभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकोप्याने आणि एकजुटीने हा ऐतिहासिक सोहळा यशस्वी करावा, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

शाळेची विद्यार्थीसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करणे, विद्यार्थ्यांसाठी पूरक व्याख्यानांचे आयोजन करणे तसेच शाळेच्या सर्वांगीण सुधारणेसाठी विविध उपक्रम राबविण्याबाबतही चर्चा झाली. शाळेने शिक्षण दिलेल्या सर्व शिक्षकांचा आणि परगावी वास्तव्यास असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा संपर्क साधून त्यांना सुवर्णमहोत्सवासाठी निमंत्रित करण्याचे ठरविण्यात आले. तसेच दिलेली जबाबदारी बॅचनुसार पार पाडण्याची ग्वाही अनेक माजी विद्यार्थ्यांनी दिली.

यासंदर्भात पुढील रविवारी सकाळी १० ते ११ या वेळेत गावकरी आणि माजी विद्यार्थ्यांची बैठक आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

बैठकीत अरुण डूमरकी, मोहन जोई, मारुती यड्डी, मारुती जोगानी, महादेव अष्टेकर, शिवाजी जोगानी, शंकर कलखांबकर, सिद्राई गिरमल, महेश जत्राटी, मारुती नागन्नावर, मोहन अष्टेकर आदींनी आपले विचार मांडले. एसडीएमसी सदस्य यल्लाप्पा हरजी यांनी प्रास्ताविक केले तर आभार मानले.

यावेळी मारुती चिंगळी, कल्लाप्पा पालकर, मोहन हरजी, अनिल चौगले, अशोक लोहार, तानाजी कलखांबकर, कृष्णा सुळेभावी, कृष्णा जोई, भुजंग गिरमल, दीपेश हवालदार, दीपक जाधव, एकनाथ सावगावकर, परशराम अचरेकर, विठ्ठल जोई, नारायण अप्पायचे, नागेश जत्राटी, महेश चिंगळी, गोपी पालकर, भावकांना सुनगार, सिद्धाप्पा हरजी, नर्सिंग गुरव, प्रवीण कारेकर, निखिल चिंगळी, उमेश मास्तमर्डी, अजय सुतार, सुभाष पालकर, मदन देसाई, शिवाजी अप्पायचे, शिवाजी चिंगळी, सोमनाथ पिंगट, सोमनाथ हरजी, यल्लेशी कांबळे, शिवाजी मालाई, लक्ष्मण जत्राटी, जोतिबा मुतगेकर, वासुदेव अचरेकर आणि सुरज सावगावकर यांच्यासह शंभरहून अधिक माजी विद्यार्थी उपस्थित होते.

१५० वर्षांची शैक्षणिक परंपरा जपणाऱ्या या शाळेचा सुवर्णमहोत्सव संस्मरणीय करण्यासाठी माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी एकत्र येण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त केला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

one × 2 =

error: Content is protected !!