कॅपिटल वनच्या १७ व्या SSLC व्याख्यानमालेस प्रारंभ

कॅपिटल वनच्या १७ व्या SSLC व्याख्यानमालेस प्रारंभ

बेळगाव : अनसुरकर गल्ली येथील कॅपिटल वन सोसायटीच्या वतीने सलग १७ व्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या SSLC व्याख्यानमालेस प्रारंभ झाला. या व्याख्यानमालेचा उद्घाटन समारंभ नुकताच ज्योती महाविद्यालयाच्या सभागृहात उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन शिवाजीराव हंडे, व्याख्याते एम. व्ही. भोसले व सुनील लाड, संस्थेचे संचालक शरद पाटील, लक्ष्मीकांत जाधव आणि कु. स्नेहा हिरोजी उपस्थित होते.

प्रारंभी सरस्वती पूजन करण्यात आले. त्यानंतर चेअरमन शिवाजीराव हंडे यांनी प्रास्ताविकातून व्याख्यानमालेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. गेल्या अनेक वर्षांपासून या उपक्रमाला विद्यार्थी आणि पालकांकडून सातत्याने मिळत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी मागील वर्षी दहावीच्या परीक्षेत इंग्रजी विषयात १०० पैकी १०० गुण मिळविल्याबद्दल कु. स्नेहा हिरोजी हिचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

शरद पाटील यांच्या आभारप्रदर्शनाने उद्घाटन समारंभाची सांगता झाली. त्यानंतर SSLC व्याख्यानमालेस प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली.

या कार्यक्रमाला संस्थेचे कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत मार्गदर्शन मिळावे आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 × three =

error: Content is protected !!