बेळगाव : संतोष फोटोजचे मालक संतोष पाटील यांनी आपल्या फोटोग्राफी स्टुडिओचे नूतन वास्तूत स्थलांतर केले असून, एम. जी. रोड, हिंदूनगर, टिळकवाडी, बेळगाव येथे नव्या स्टुडिओचा उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला.
या नूतन स्टुडिओचे उद्घाटन संतोष पाटील यांचे वडील हरिभाऊ पाटील आणि आई शांता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी फकिरा पाटील, सविता पाटील, ज्येष्ठ फोटोग्राफर मोहन चव्हाण आणि डी. बी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाला सुभाष औळकर, अनिल बेनके, किरण जाधव, सचिन पाटील, संजय पाटील यांच्यासह पाटील कुटुंबीय, मित्रपरिवार आणि हितचिंतक उपस्थित होते.
नव्या वास्तूत सुरू झालेल्या संतोष फोटोजच्या पुढील वाटचालीस उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. या स्थलांतरामुळे संतोष फोटोजच्या व्यवसायाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
