महिलांसाठी २९ नोव्हेंबरला शहापुरात रंगणार ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रम

महिलांसाठी २९ नोव्हेंबरला शहापुरात रंगणार ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रम

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समिती आणि श्रीराम सेना हिंदुस्तानचे नेते रमाकांत कोंडुस्कर यांच्या आयोजनातून महिलांसाठी खास ‘खेळ पैठणीचा’ या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. २९ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता शहापूर येथील श्रीराम मंदिर, आचार्य गल्ली, गाडेमार्ग येथे हा कार्यक्रम होणार आहे.

महिलांच्या मनोरंजनासाठी आणि भारतीय संस्कृतीतील पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महिलांसाठी विविध मनोरंजक खेळांसह आकर्षक बक्षिसांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी आजरा आणि गडहिंग्लज तालुक्यांत प्रसिद्ध असलेले ‘होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालक मिलन डिसोजा विशेष उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाची अधिक माहिती मिळवण्यासाठी सागर पाटील, प्रशांत भातकांडे, राजेंद्र बिरजे, सूरज चव्हाण आणि विशाल कंग्राळकर यांच्याशी संपर्क साधावा.

कार्यक्रमाचा तपशील :

  • दिनांक : रविवार, २९ नोव्हेंबर २०२६
  • वेळ : सायंकाळी ५.३० वाजता
  • स्थळ : श्रीराम मंदिर, आचार्य गल्ली, गाडेमार, शहापूर
  • संपर्क : ९९६४७७७५६५
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

fifteen + 1 =

error: Content is protected !!