शास्त्री नगर येथे दुकानात पेट्रोल ओतून आग; ५० हजारांचे नुकसान, आरोपीला अटक

शास्त्री नगर येथे दुकानात पेट्रोल ओतून आग; ५० हजारांचे नुकसान, आरोपीला अटक

बेळगाव : जुन्या वादातून दुकानात पेट्रोल ओतून आग लावल्याची घटना बेळगावातील शास्त्रीनगर परिसरात घडली आहे. या घटनेत दुकानातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे साहित्य जळून नुकसान झाले आहे. याप्रकरणी खडेबाजार पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार नीता सतीश पटेल (रा. नेसरकर प्लाझा, अटले चाळ, शास्त्रीनगर, बेळगाव) यांच्या दुकानात १५ नोव्हेंबर २०२६ रोजी मध्यरात्री १२.२७ ते १२.३० या वेळेत ही घटना घडली.

आरोपी विनायक चंद्रकांत वेर्णेकर (वय ४०, रा. राजेंद्र बिल्डिंग, गणेश मार्ग, गणपती मंदिरासमोर, शास्त्रीनगर, बेळगाव) याने जुन्या वादाचा राग मनात धरून बाटलीत पेट्रोल भरून आणले. त्यानंतर तक्रारदार यांच्या दुकानाचे गेट उघडून आत प्रवेश केला आणि दुकानाच्या मागील बाजूस पेट्रोल ओतून आग लावली.

दुकानाच्या मागील बाजूस नागरिक वास्तव्यास असल्याची माहिती असूनही आरोपीने हे कृत्य केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या आगीत दुकानातील सुमारे ५० हजार रुपयांचे साहित्य जळून नुकसान झाले.

याप्रकरणी खडेबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९८/२०२६ दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपी विनायक चंद्रकांत वेर्णेकर याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

seventeen − five =

error: Content is protected !!