बेळगाव : दीपावली सणानिमित्त शहरातील समर्थ नगर येथील पाचव्या क्रॉसमध्ये श्री एकदंत युवक मंडळ एसटीएम संचलित श्री दुर्गाशक्ती महिला मंडळाच्या वतीने भव्यदिव्य आकाशकंदील उभारण्यात आला आहे. आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात आलेला हा आकाशकंदील परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.
समर्थ नगर येथील पाचव्या क्रॉसच्या गल्लीच्या मध्यभागी हा आकाशकंदील उभारण्यात आला आहे. तब्बल ७ बाय ५ फूट आकाराचा आणि १० फूट उंचीचा हा आकर्षक आकाशकंदील सध्या परिसराचे खास आकर्षण ठरत आहे. कंदिलामध्ये करण्यात आलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईमुळे संपूर्ण गल्ली आणि रस्ता प्रकाशमय झाला आहे.
दीपावलीच्या निमित्ताने पारंपरिक सणाचा उत्साह जपत मंडळाने केलेली ही सजावट नागरिकांसाठी पाहण्याजोगी ठरत आहे. या उपक्रमामुळे समर्थ नगर परिसरातील दीपावलीच्या उत्साहात आणखी भर पडली आहे.
हा भव्य आकाशकंदील उभारण्यासाठी सहदेव ताशीलदार, पराग देशपांडे, आनंद नाईक, अंबज सावंत, भवरलाल मेघावल, अरुण गावडे, प्रशांत देवन, संतोष कणेरी, अक्षय टिकारे, रामदास गवस, आरती गिरी, गिरीश कणेरी, विनोद गेहलोत, अभिराज चव्हाण आदींनी विशेष परिश्रम घेतले.
श्री एकदंत युवक मंडळ आणि श्री दुर्गाशक्ती महिला मंडळाच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे. मंडळाच्या वतीने बेळगावमधील सर्व हिंदू बांधवांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत.
