मराठी विद्यानिकेतनच्या मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स क्लबच्या खो-खो खेळाडूंची राज्य व राष्ट्रीय स्तरावर निवड

मराठी विद्यानिकेतनच्या मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स क्लबच्या खो-खो खेळाडूंची राज्य व राष्ट्रीय स्तरावर निवड

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाच, तर राष्ट्रीय सीनियर महिला स्पर्धेसाठी तीन खेळाडूंची निवड

बेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव येथील मराठी विद्यानिकेतनच्या मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स क्लबच्या खो-खो खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये स्थान मिळवले आहे. जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पाच खेळाडूंची बेंगळुरू येथे होणाऱ्या पदवीपूर्व राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच, राष्ट्रीय महिला सीनियर खो-खो निवड चाचणीतून तीन खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

पदवीपूर्व युनिव्हर्सिटी कॉलेजच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स क्लबच्या वैष्णवी कोवाडकर, ऐश्वर्या कंग्राळकर, स्नेहा हिरोजी, साक्षी पाटील आणि प्रेरणा मुतगेकर यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. त्यांच्या कामगिरीच्या जोरावर या पाचही खेळाडूंची बेंगळुरू येथे होणाऱ्या पदवीपूर्व राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

दरम्यान, धारवाड येथील भैरीदेवकोप्प येथे झालेल्या राष्ट्रीय महिला सीनियर खो-खो निवड चाचणीतही मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंनी आपली गुणवत्ता सिद्ध केली. वैष्णवी कोवाडकर, स्नेहा हिरोजी आणि सरिता पाटील या तीन खेळाडूंची कर्नाटक संघातून महाराष्ट्रातील जालना येथे होणाऱ्या राष्ट्रीय सीनियर महिला खो-खो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या खेळाडूंना माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एन. सी. उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. जी. पाटील, समन्वयक शिक्षिका सविता पवार, शिक्षण संयोजिका नीला आपटे, प्रशिक्षक श्रीधर बेन्नाळकर, क्रीडा शिक्षक महेश हगीदळे, दत्ता पाटील आणि वैभवी दळवी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

खेळाडूंनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्येही त्या उत्तम कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two × 3 =

error: Content is protected !!