लहान मुला-मुलींनी सादर केली शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके; मान्यवरांची उपस्थिती
बेळगाव : कै. श्रीमती आनंदीबाई कृष्णा वांद्रे यांच्या स्मरणार्थ श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या वतीने आयोजित चक्रपाणी शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिराचा सांगता समारंभ २१ ऑक्टोबर २०२६ रोजी उत्साहात पार पडला. यावेळी शिबिरात प्रशिक्षण घेतलेल्या लहान मुला-मुलींनी शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी बेळगाव सिटी अँड तालुका फोटो/व्हिडिओग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष डी. बी. पाटील आणि धारकरी अजित जाधव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला. रेखाताई पवार यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले. तसेच कै. श्रीमती आनंदीबाई कृष्णा वांद्रे यांच्या प्रतिमेला बेळगावी श्री बसवेश्वर को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हाइस चेअरमन आणि बेळगाव बार असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी अॅड. सचिन शिवणवर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. रवी पाटील यांचे दीपक वांद्रे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. डी. बी. पाटील यांचे स्वागत अजित जाधव यांनी, बीसीटीपीएचे वेल्फेअर अध्यक्ष संतोष पाटील यांचे स्वागत अजित जाधव यांनी, तर अॅड. सचिन शिवणवर यांचे स्वागत महेश पेडणेकर यांनी केले. सामर्थ्य महिला मंडळाच्या अध्यक्षा दयाताई कटारे यांचे स्वागत रेखाताई पवार यांनी केले. लक्ष्मी बडवे यांचे स्वागत प्रज्ञा पेडणेकर यांनी, तर रेखाताई पवार यांचे स्वागत सुचिता वांद्रे यांनी केले.
कार्यक्रमात चक्रपाणी युद्धकला प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख सचिन चोपडे यांनी शिवकालीन युद्धकलेची विविध प्रात्यक्षिके सादर करून त्याविषयी सविस्तर माहिती दिली. शिबिरादरम्यान प्रशिक्षण घेतलेल्या बालकांनी युद्धकलेतील विविध कौशल्ये प्रत्यक्ष सादर केली. या उपक्रमामुळे लहान मुलांमध्ये शौर्य, शिस्त आणि ऐतिहासिक परंपरेविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत होत असल्याचे या कार्यक्रमातून दिसून आले.
या समारंभाला श्वेता पेडणेकर, मनीषा वांद्रे, राजश्री जाधव, सचिन गोवेकर, राम परदेशी, बाळू सांगूकर, धीरज गुप्ता, योगेश पेडणेकर, यतीन हंडे, कृष्णा नाईक, प्रभाकर पाटील, प्रवीण चंदगडकर, समर्थ नगर गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष, दीपक नगरकर, राम कटारे, पवन शिरोडकर आणि विनायक शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन नितीन महाले यांनी केले. शिवकालीन युद्धकलेचे प्रशिक्षण आणि त्याचे सादरीकरण यामुळे शिबिराचा सांगता समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
