जिल्ह्यातील ८० स्पर्धकांचा सहभाग; विविध गटांत खेळाडूंनी पटकावली सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके
बेळगाव : बेधडक बेळगाव वृत्तसेवा
बेळगाव जिल्हा सार्वजनिक शालेय शिक्षण विभाग आणि बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत बेळगाव जिल्ह्यातील ८० स्पर्धकांनी सहभाग घेतला. शिवगंगा स्पोर्ट्स क्लब स्केटिंग रिंक येथे ही स्पर्धा उत्साहात पार पडली.
स्पर्धेचे उद्घाटन डी.पी.ओ. जुनेदी पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, शिक्षक सुभाष गंभीर, चंद्रू तोगारी, आय. एम. पटेल, स्केटर्स तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल
१४ वर्षांखालील मुली
- आराध्या पी. – २ सुवर्णपदके
- ऋतुरा दळवी – २ रौप्यपदके
- तन्वी एच. – २ कांस्यपदके
- हेमा कोडिनीवाल – १ सुवर्णपदक
- पूर्वी चौधरी – ३ सुवर्णपदके
- वीरा पाटील – ३ रौप्यपदके
१४ वर्षांखालील मुले
- अक्षय अरुणकुमार – १ सुवर्णपदक
- श्रीशेल सोनाजी – १ रौप्यपदक
१७ वर्षांखालील मुली
- जान्हवी तेंडुलकर – २ सुवर्णपदके
- शर्वरी दद्दीकर – १ रौप्य व १ कांस्यपदक
- प्रतीक्षा वाघेला – १ सुवर्ण व १ रौप्यपदक
- अन्वी सोनार – ३ सुवर्णपदके
- लावण्या कोपद – १ सुवर्णपदक
१७ वर्षांखालील मुले
- ऋत्विक दुबाशी – २ सुवर्णपदके
- श्रीराज जोगिन – १ सुवर्णपदक
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी योगेश कुलकर्णी, विठ्ठल गंगणे आणि सोहम हिंडलगेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
