मदन कोंडुस्कोप आणि नरेंद्र मुगळी यांची नॅशनल मीट व मिनी ऑलिम्पिक २०२६-२७ साठी निवड

मदन कोंडुस्कोप आणि नरेंद्र मुगळी यांची नॅशनल मीट व मिनी ऑलिम्पिक २०२६-२७ साठी निवड

लाँग जंप आणि ८० मीटर हर्डल्समध्ये कांस्यपदकांची कमाई; बेळगावच्या खेळाडूंचे यश

बेळगाव : प्रतिनिधी

बेळगावच्या मदन कोंडुस्कोप आणि नरेंद्र मुगळी यांनी अॅथलेटिक्स स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत नॅशनल मीट आणि मिनी ऑलिम्पिक २०२६-२७ साठी निवड मिळवली आहे. क्रीडा भारती आयोजित बेळगाव जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने बेळगाव येथील नेहरू स्टेडियमवर आयोजित स्पर्धेत दोन्ही खेळाडूंनी कांस्यपदक पटकावत आपल्या कौशल्याची छाप पाडली.

या स्पर्धेत मदन कोंडुस्कोप याने लाँग जंप प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदक मिळवले. तर नरेंद्र मुगळी याने ८० मीटर हर्डल्स प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली. दोघांनीही आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर हे यश संपादन केले.

या दोन्ही खेळाडूंना प्रशिक्षक कृष्णा जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी केलेल्या मेहनतीला या यशामुळे महत्त्वपूर्ण फळ मिळाले आहे.

मदन कोंडुस्कोप आणि नरेंद्र मुगळी यांच्या या यशामुळे बेळगावच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, नॅशनल मीट आणि मिनी ऑलिम्पिक २०२६-२७ मध्येही ते उत्कृष्ट कामगिरी करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दोन्ही खेळाडूंचे या यशाबद्दल अभिनंदन होत असून, आगामी स्पर्धांसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

15 − 3 =

error: Content is protected !!