किरण जाधव यांच्या वतीने श्री जत्ती मठ येथे देवीची पूजा-अर्चा

किरण जाधव यांच्या वतीने श्री जत्ती मठ येथे देवीची पूजा-अर्चा

बेळगाव : प्रतिनिधी

दसरा उत्सव व नवरात्रोत्सवानिमित्त किरण जाधव यांच्या वतीने बेळगाव शहराचे सांस्कृतिक व धार्मिक केंद्रबिंदू आणि मराठा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या मानाच्या श्री जत्ती मठ येथे देवीची विधिवत पूजा-अर्चा करून आशीर्वाद घेण्यात आले.

यावेळी देवीच्या चरणी यंदा चांगला पाऊस होऊन शेतकरी बांधवांची शेती समृद्ध व्हावी, सर्वत्र सुख, शांती व समृद्धी नांदावी, प्रत्येकाच्या जीवनात उत्तम आरोग्य, ऐश्वर्य आणि भरभराट लाभावी, अशी प्रार्थना करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण घेऊन उज्ज्वल भविष्य घडविण्याची संधी मिळावी, अशी मनोकामना व्यक्त करण्यात आली.

आई जगदंबेच्या कृपेने सर्व भक्तांच्या जीवनात आनंद, समाधान आणि यश नांदो, तसेच समाजात एकता व बंधुभाव वृद्धिंगत होवो, अशी प्रार्थना किरण जाधव यांनी देवीच्या चरणी केली.

याप्रसंगी बेळगाव येथील जत्ती मठाचे सरपंच दत्ता जाधव, मदन बामणे, चंद्रकांत कोंडूसकर, हनुमंत कागलकर, राजन जाधव यांच्यासह मठाचे पदाधिकारी उपस्थित होते.

आई जगदंबेचा उदो उदो!

किरण जाधव यांच्या वतीने सर्व भक्तांना दसरा व नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three × 4 =

error: Content is protected !!