मार्कंडेय नदीत अज्ञात व्यक्तीचा अर्धवट कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला; ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे आवाहन

मार्कंडेय नदीत अज्ञात व्यक्तीचा अर्धवट कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला; ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे आवाहन

बेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव तालुक्यातील काकती पोलीस ठाण्याच्या हद्दीत मार्कंडेय नदीमध्ये एका अज्ञात पुरुषाचा अर्धवट कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसून, याप्रकरणी काकती पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

17 ऑक्टोबर 2026 रोजी काकती येथील मदन सिद्राय कडोलकर हे सकाळी शेतात कामासाठी जात असताना त्यांना मार्कंडेय नदीमध्ये एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला. त्यांनी याबाबत काकती पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

पोलिसांनी दिलेल्या वर्णनानुसार, मृत व्यक्तीचे वय अंदाजे 40 ते 45 वर्षे असून, उंची सुमारे 5 फूट 5 इंच आहे. मृत व्यक्तीने निळ्या रंगाची हाफ पँट आणि चॉकलेटी रंगाची निकर परिधान केली आहे. त्याच्या उजव्या हातावर राखी असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

मृतदेह बराच काळ पाण्यात राहिल्याने कुजलेल्या अवस्थेत आहे. चेहऱ्याची ओळख पटविणे कठीण झाले असून, चेहऱ्यावरील केवळ दोन्ही कान शिल्लक असल्याचे पोलिसांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे. हात व पायांच्या काही भागांचे जलचर प्राण्यांनी नुकसान केले आहे.

या प्रकरणी काकती पोलीस ठाण्यात यूडीआर क्रमांक 43/2026, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम 194(3)(iv) अंतर्गत नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे आवाहन

मृत व्यक्तीबाबत कोणाला माहिती असल्यास किंवा त्याची ओळख पटत असल्यास खालील क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन बेळगाव शहर पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

  • बेळगाव शहर पोलीस नियंत्रण कक्ष: 0831-2405233
  • काकती पोलीस निरीक्षक: 9480804115
  • काकती पोलीस ठाणे: 0831-2405203
  • आपत्कालीन मदत क्रमांक: 112

मृत व्यक्तीच्या नातेवाइकांनी किंवा त्याच्याबाबत माहिती असलेल्या नागरिकांनी पोलिसांना माहिती देऊन तपासात सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त, बेळगाव शहर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 × five =

error: Content is protected !!