प्रादेशिक आयुक्त के. एम. जानकी यांची शांताई वृद्धाश्रमाला भेट

प्रादेशिक आयुक्त के. एम. जानकी यांची शांताई वृद्धाश्रमाला भेट

वृद्धांशी संवाद साधत जाणून घेतली आस्थेने विचारपूस; माजी महापौर विजय मोरे यांच्या हस्ते सत्कार

बेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव विभागाच्या प्रादेशिक आयुक्त के. एम. जानकी, आयएएस यांनी शांताई वृद्धाश्रमाला भेट देऊन तेथील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वृद्धाश्रमातील ज्येष्ठांची आस्थेने विचारपूस करत त्यांच्या तब्येतीची आणि दैनंदिन जीवनाची माहिती जाणून घेतली. त्यांच्या या भेटीमुळे वृद्धाश्रमातील वातावरण आनंददायी झाले.

या भेटीदरम्यान प्रादेशिक आयुक्त जानकी यांनी वृद्धाश्रमातील रहिवाशांसोबत काही वेळ घालवला. ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत त्यांची विचारपूस केली. त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत आपुलकी व्यक्त केली. ज्येष्ठ नागरिकांना प्रेम, सन्मान आणि जिव्हाळा मिळणे किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव या भेटीतून अधोरेखित झाली.

याप्रसंगी बेळगावचे माजी महापौर विजय मोरे, मारिया मोरे आणि संतोष मामदापूर यांनी प्रादेशिक आयुक्त के. एम. जानकी यांचा सत्कार करून त्यांच्याप्रति आदर व्यक्त केला.

यावेळी विजय मेट्राणी, लीला शाह यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

समाजातील ज्येष्ठ नागरिकांना केवळ आवश्यक सुविधा देणेच नव्हे, तर त्यांच्यासोबत वेळ घालवून त्यांना प्रेम, आपुलकी आणि सन्मान देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. प्रादेशिक आयुक्तांच्या या भेटीमुळे ज्येष्ठ नागरिकांप्रती संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश मिळाला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

fourteen − thirteen =

error: Content is protected !!